पोस्ट्स

Blog # 2 - My Bikes - B'Twin 520

इमेज
 एक वर्षाच्या अनुभव घेतलावर नवीन सायकल घायची होती आणि जुनी सायकल मी विकून पण टाकली होती. मग सायकलसाठी मान्यवर असलेली बरीच दुकान धुंडाळली. पण माझ्या बजेट मध्ये बसले अशी आणि प्रथम दुर्ष्टीला आवडेल अशी मिळत नव्हती. मग एका मित्राने सांगितला प्रमाणे मी एका शनिवारी ठाणे डेकॅथॉलोनला गेलो. पाच सहा हजार पासून ते लाखापण सायकल होत्या. मला आतापर्यंत जी काही माहिती होती त्या नुसार Rockrider 520 ही एक चांगला पर्याय आहे हे लक्षात आले. पण बजेट... पण अस म्हणतात की सायकल हेही एक व्यसनच आहे आणि ते माझ्या बाबतीत तरी हळूहळू खर ठरत होत. व्यसन आणि बजेट यांची सांगड घातलीच पाहिजे होती. शेवटी कसाबसा मेळ जुळुन आलाच.  तस सायकलीवर नुसत भागत नाही. बर्‍याच ईतर Accessories पण हळूहळू लागत रहातात. धर हॅडल आणि मार पेडल असल चालत नाही. पण या सायकलने मी खुप छान फिरलो. कित्येक नवीन ठिकाणी गेला. नवीन मित्र मिळाले.  या सायकलने केलेल्या काही विशेष लक्षात राहीलेल्या राईडस बद्दल पुढच्यावेळी....  सुनिल कोळंबकर

Blog # 1 - My Bikes

इमेज
कॉलेजनंतर कितीतरी वर्षांनी पुन्हा सायकल चालवायची इच्छा होत होती. जवळच्या सायकल शॉपमधून एक दिवस सरळ एक सायकल घेऊनच आलो. अतिशय साधी "Kross" कंपनीची पण गियर वाली. कारण मला माझ्याच वर विश्वास नव्हता. हे वय असले नकोते छंद करायचे नाही अशी सूचना वजा तंबी मला घरातून मिळलीच. बरेच लोक एकदम ब्रँडेड सायकल घेतात आणि नंन्तर ती कुठेतरी पडून रहाते. मला हेच नको होते. हळू हुळू वेळ मिळाला की चालवत राहिलो. काही दिवसांनी सकाळी सायकल चालवायचा छंद लागून गेला छंद सवयीत कधी बदलला ते माझं मलाच कळल नाही. सायकल चालवयेच अंतर वाढेल.  वाढलेली आवड मला सायकलींग बद्दल अधिकाअधीक माहिती इंटरनेट वरून मिळवणास भाग पाडत होती. जवळपास कोणी सायकल चालवतं का, कुठला ग्रुप आहे काय याचा शोध सुरु झाला आंणी एक दिवस शोध लागला ...  The  Mulund Riders या ग्रुपने माझं सायकलिंग विश्व बदलून टाकलं. रोज नवं नवीन माहित मिळत गेली. सायकलची फ्रेम, बसायची सीट, टायर मधली हवा, गियर, चालवताना काय काय काळजी घ्यावी..  आणखी बरेच .. सायकलिंग मध्ये बाप असलेली पण माझ्या सारख्या नवख्यालाही  बरोबर घेऊन राईड कर...