Blog # 1 - My Bikes

कॉलेजनंतर कितीतरी वर्षांनी पुन्हा सायकल चालवायची इच्छा होत होती. जवळच्या सायकल शॉपमधून एक दिवस सरळ एक सायकल घेऊनच आलो.अतिशय साधी "Kross" कंपनीची पण गियर वाली. कारण मला माझ्याच वर विश्वास नव्हता. हे वय असले नकोते छंद करायचे नाही अशी सूचना वजा तंबी मला घरातून मिळलीच.

बरेच लोक एकदम ब्रँडेड सायकल घेतात आणि नंन्तर ती कुठेतरी पडून रहाते. मला हेच नको होते. हळू हुळू वेळ मिळाला की चालवत राहिलो. काही दिवसांनी सकाळी सायकल चालवायचा छंद लागून गेला



छंद सवयीत कधी बदलला ते माझं मलाच कळल नाही. सायकल चालवयेच अंतर वाढेल.  वाढलेली आवड मला सायकलींग बद्दल अधिकाअधीक माहिती इंटरनेट वरून मिळवणास भाग पाडत होती. जवळपास कोणी सायकल चालवतं का, कुठला ग्रुप आहे काय याचा शोध सुरु झाला आंणी एक दिवस शोध लागला ... 

The Mulund Riders

या ग्रुपने माझं सायकलिंग विश्व बदलून टाकलं. रोज नवं नवीन माहित मिळत गेली. सायकलची फ्रेम, बसायची सीट, टायर मधली हवा, गियर, चालवताना काय काय काळजी घ्यावी..  आणखी बरेच .. सायकलिंग मध्ये बाप असलेली पण माझ्या सारख्या नवख्यालाही  बरोबर घेऊन राईड करणारे  बरेच रायडर.. आणखी काय पाहीजे .. आंधळा मागतो एक डोळा ..... नवीन मित्र,  नवीन ओळखी, माझं समाजकी जीवन बदलूनच गेलं. 

नवीन दिवस रोज नवीन सुरवात घेऊन येऊ लागला. सायकलची साडेल आणि पेडल माझे सगेसोबती झाले.  

एक वर्ष झालं आणि मला नवीन सायकल घ्यायचे वेध लागले. पण नवीन आली कि मी तीच चालवणार व जुनी पडून रहाणार म्हणून ती Kross ची सायकल मी विकून टाकली. 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा